Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्ली: 12 दहशतवाद्यांना अटक

दिल्ली: 12 दहशतवाद्यांना अटक
, बुधवार, 4 मे 2016 (13:21 IST)
नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राजधानी क्षेत्रात 12 दहशतवाद्यांना अटक केली आहे. 
 
विशेष पथकाचे विशेष आयुक्त अरविंद दीप यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्याभरापासून यावर काम होत होतं. अखेर मंगळवारी रात्री गोकुळपुरी भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ज्यात दिल्लीतील गोकुळपुरी भागातून आठ जणांना आणि उत्तर प्रदेशातील देवबंद येथून चार जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
यांच्याजवळ आयईडी स्फोटके सापडली आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी यांचा संबंध असून त्याची चौकशी चालत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे कर्करोग, कंपनीला 366 कोटींचा दंड