Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुबईला जाणसाठी सलमानने मागितली परवानगी

दुबईला जाणसाठी सलमानने मागितली परवानगी
मुंबई , शुक्रवार, 22 मे 2015 (13:59 IST)
‘हिट अँड रन’ प्रकरणात दोषी ठरलेला व सध्या जामिनावर असलेला ‘दबंग’ अभिनेता सलमान खान याने दुबईला जाण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठाकडे परवानगी मागितली आहे.
 
सुमारे 13 वर्षापूर्वीच्या अपघाताप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने 6 मे रोजी सलमानला पाच वर्षाची शिक्षा ठोठावली होती. उच्च न्यायालयाने या निकालाला स्थगिती देत सलमानला सशर्त जामीन मंजूर केला. जामीन देताना न्यायालयाने सलमानचा पासपोर्ट ताब्यात घेतला. ‘दुबईत 29 मे रोजी होणार्‍या एका कार्यक्रमात मला सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी दुबईला जाण्याची परवानगी द्यावी’, अशी मागणी सलमानने अर्जात केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi