Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन मतदार ओळखपत्रांमुळे बेदी अडचणीत

दोन मतदार ओळखपत्रांमुळे बेदी अडचणीत
दिल्ली , गुरूवार, 29 जानेवारी 2015 (12:17 IST)
दोन मतदार ओळखपत्र असल्याने दिल्लीतील भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी अडचणीत आल्या आहेत.

याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दरम्यान, या चौकशीत दोषी आढळल्यास बेदी यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकणार असल्याने त्यांची उमेदवारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
त्यांच्या एका ओळखपत्रावर उदय पार्क येथील घराचा पत्ता आहे. तर दुस-या मतदार ओळखपत्रावर तालकटोरा येथील पत्ता असल्याचे पुढे आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi