Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरेंद्र मोदींच्या जीवाला हिंदुत्ववाद्यांचाही धोका?

नरेंद्र मोदींच्या जीवाला हिंदुत्ववाद्यांचाही धोका?
दिल्ली , सोमवार, 6 जुलै 2015 (10:39 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुस्लिम दहशतवादी संघटनांबरोबरच हिंदुत्ववाद्यांचाही धोका असल्याचा दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागाने दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांकडून धोका असल्याने मोदी यांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मात्र, मोदी हे मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी अवाजवी प्रयत्न करीत असल्याचे काही हिंदुत्ववादी संघटनांचे मत झाले आहे.  गुजरात दंगलप्रकरणात अनेक हिंदू नेत्यांना शिक्षा झाल्याचा राग असल्याने काही कट्टररपंथी हिंदुत्ववादी संघटनांकडूनही मोदींच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. त्यामुळे अधिक दक्षता घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi