Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरेंद्र मोदी मुर्दाबादच्या घोषणा देणारा सपा नेता अटकेत

नरेंद्र मोदी मुर्दाबादच्या घोषणा देणारा सपा नेता अटकेत
मुझफ्फरनगर , सोमवार, 30 जून 2014 (17:35 IST)
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरात समाजवादी पक्षाच्या एका नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. महमूद आलम असे या नेत्याचे नाव आहे. 'पाकिस्तान जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद' अशा घोषणा देताना पोलिसांनी आलमला अटक केली. आलम विरोधात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महमूद आलम हा मेरठ-करनाल महामार्गावर गाड्या थांबवून बेकायदा वसूली करत होता. पोलिसांनी त्याला जाब विचारला असता त्याने अरेरेवीची भाषा केली. विशेष म्हणजे पाकिस्तान जिंदाबाद आणि नरेंद्र मोदी मुर्दाबादच्या घोषणाही त्याने केल्या. त्यामुळे पोलिसांनी आलम विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाख केला आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi