Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नव्या हवाई धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

नव्या हवाई धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाने नागरी हवाई वाहतुकीच्या नव्या धोरणाला मंजुरी दिली गेली. त्यामध्ये एक तासाच्या उड्डाणासाठी ‍अधिकतम अडीच हजार रूपये भाडे आकारण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. या नव्या धोरणानुसार हवाई प्रवासाचे दर कमी होण्याची शक्यता असून प्रवाशांना अनेक सुविधांचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.
 
नव्या धोरणात हवाई क्षेत्राचा विस्तार आणि प्रवासी संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. आधीच्या अटींनुसार भारतीय हवाई कंपन्यांना परदेशात हवाई वाहतूक सुरु करण्यासाठी पाच वर्षांचा अनुभव अनिवार्य होता. आता नव्या प्रस्तावानुसार भारतीय कंपन्यांकडे परदेशात हवाई सेवा सुरु करण्यासाठी वीस विमानांचा ताफा आवश्यक आहे. मात्र पाचवर्ष थांबावे लागणार नाही. 
 
आता भारतीय हवाई कंपन्या सहजपणे परदेशात हवाई सेवा सुरु करु शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘ईडी’चे नवीन आरोपपत्र, मिशेलचा समावेश