Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निठारी हत्याकांड: नराधम सुरेंद्र कोलीला 'दसना'त हलवले

निठारी हत्याकांड: नराधम सुरेंद्र कोलीला 'दसना'त हलवले
गाझियाबाद , बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (17:40 IST)
निठारी हत्याकांडातील दोषी आरोपी सुरेंद्र कोली याला गाझियाबाद येथील दसना कारागृहात बुधवार हलवले. सुरेंद्र कोली याला मेरठ कारागृहात फाशीची शिक्षा होणार होती. परंतु आता दसना येथील कारागृहात सुरेंद्र कोलीच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुरेंद्र कोलीच्या शिक्षेबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे, मेरठ कारागृहाचे अधीक्षक एसएचएम रिझवी यांनी सांगितले. 

कोली याला 12 सप्टेंबर रोजी फासावर लटकवले जाणार होते. परंतु त्याच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याने कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi