Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेपाळचे नवीन पंतप्रधान, डॉ. बाबूराम भट्टराय!

नेपाळचे नवीन पंतप्रधान, डॉ. बाबूराम भट्टराय!

वेबदुनिया

काठमांडू , सोमवार, 29 ऑगस्ट 2011 (11:14 IST)
रविवारी नेपाळच्या पंतप्रधानपदी माओवादी नेते डॉ. बाबूराम भट्टराय यांची निवड झाली. त्यांनी प्रतिस्पर्धी नेपाळी कॉंग्रेसचे आर. सी. पौडयाल यांचा पराभव केला. युनायटेड डेमोक्रॅटिक मधेशी फ्रंट (यूडीएमएफ)च्या पाठिंब्याच्या जोरावर भट्टराय पंतप्रधान बनले.

नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे डॉक्‍टरेट असलेले 57 वर्षीय भट्टराय यांना 340 मते, तर पौडयाल यांना 235 मते मिळाली. नेपाळमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या "यूडीएमएफ'ने भट्टराय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये गोरखा मतदारसंघ क्रमांक दोनमधून भट्टराय मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. यापूर्वी भट्टराय यांनी माओवादी अध्यक्ष पुष्प कमाल दहल ऊर्फ प्रचंड यांच्या सरकारमध्ये उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. झालानाथ खनाल यांची 3 फेब्रुवारी रोजी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड झाली होती, मात्र शांतता प्रक्रियेत अपयशी ठरल्याने त्यांनी 14 ऑगस्टला राजीनामा दिला.


Share this Story:

Follow Webdunia marathi