Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेमबाज तारा शाहदेववर धर्मांतरास बळजबरी; पतीला अटक

नेमबाज तारा शाहदेववर धर्मांतरास बळजबरी; पतीला अटक
रांची , गुरूवार, 28 ऑगस्ट 2014 (11:55 IST)
झारखंडमधील नेमबाज तारा शाहदेव हिच्याशी विवाह करून तिला धर्मांतरास बळजबरी करणारा आरोपी रंजितसिंह कोहली ऊर्फ रकिबुल हसन याला आई कौशल्याराणीसह दिल्ली पोलिसांनी अटक केली. रकिबुलला बुधवारी कोर्टाने तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिले. रकिबुल हसनवर विवाहाच्या नावावर फसवणूक केल्याचा तसेच पत्नीला धर्म बदलण्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप आहे.
 
झारखंडची राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेवने आरोप केला की, आरोपी रकिबुल हसनने स्वत:चे नाव रंजितसिंह कोहली असल्याचे सांगून तिच्याशी विवाह केला. आरोपीच्या नावे अजामीनपात्र वॉरंट दाखल झाल्यापासून तो फरारच होता. दरम्यानच्या काळात त्याने गृहसचिव तसेच पोलिस महासंचालकांना पत्र लिहून निर्दोष असल्याचा दावा केला होता.
 
पत्रात त्याने की, तो धर्माने शीख आहोत. त्याचा पुरावा म्हणून स्वत:चे शैक्षणिक प्रमाणपत्र व वाहन परवाना असल्याची माहिती त्याने दिली होती. मी सर्व धर्म समान मानतो. मी बायबल, कुराण, वेदांचा अभ्यास केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्राने राज्याकडे याबाबत अहवाल मागितला होता. झारखंड सरकारने मंगळवारी रात्री उशिरा अहवाल पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
दरम्यान, रकिबुलच्या अटकेसाठी विशेष पोलिस पथक व रांची पोलिसांनी एक टीम तयार केली. त्यानुसार काही पोलिस अधिकाऱ्यांना रकिबुल व त्याच्या आईच्या फोटोसह दिल्लीला पाठवण्यात आले. रांची पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी तारा शाहदेवने अनेक टीव्ही चॅनल्सना लाइव्ह फोन केला होता. त्यात तिने रकिबुलचे तीन मोबाइल नंबर दिले होते. 
 
रंजित ऊर्फ रकिबुलसोबत कोणतेही नाते ठेवण्याचा प्रश्नच नाही. तशी इच्छादेखील नाही. आता मला त्याच्या नावाचीदेखील घृणा वाटते. ज्या व्यक्तीच्या धर्माचा पत्ता नाही. तो कधी हिंदू बनतो तर कधी मुसलमान,  अशा व्यक्तीवर माझा आता विश्वास बसणार नाही. जो गेल्या सात वर्षांसून नमाज अदा करतो आहे, तो म्हणतो की मी मुस्लिम नाही. इस्लाम धर्म न स्वीकारताच नमाज अदा करतोय. हे कसे शक्य आहे? त्याच्याशी मला आता कोणतेही संबंध ठेवायचा नसल्याचे तारा शाहदेवने रांचीमध्ये सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi