केरळच्या अनेक भागात मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करण्यात येत असल्याच्या वृत्ताची गंभीर दखल केरळ उच्च न्यायालयाने घेतली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे? याची संपूर्ण माहिती न्यायालयाला देण्याचे आदेश न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला दिले आहेत.
मागील अनेक दिवसांपासून केरळमध्ये असे प्रकार वाढले आहेत. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर दबाव निर्माण करून त्यांचे धर्मांतरण करत त्यांना इस्लामची दीक्षा घेण्यास भाग पाडणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याच्या तक्रारीही आल्या आहेत.
या विषयी न्यायालय गंभीर असून, सरकारने या प्रकरणाची संपूर्ण माहिती द्यावी असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.