Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंजाब: दहशतवादी हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू

पंजाब: दहशतवादी हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू
, सोमवार, 27 जुलै 2015 (09:52 IST)
पंजाबमधील स्थिती नियंत्रणात आहे. मी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल तसेच बीएसएफ, एनएसए, डीजी यांच्या संपर्कात आहे - गृहमंत्री राजनाथ सिंह

पंजाबमध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानमधील नरोवाल येथून आले - IBची माहिती.

पंजाबमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व इतर अधिका-यांसोबत उच्चस्तरीय बैठक. अर्थमंत्री अरूण जेटलीही बैठकीस उपस्थित.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केला पंजाबमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध.

webdunia
चंदिगड- पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील दिनानगर येथे आज पहाटेपासून दहशतवाद्यांकडून हल्ला सुरू झाला असून यात तीन पोलिस कर्मचार्‍यांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी पोलिस स्टेशन व जम्मूकडे जात असलेल्या बसवर हा हल्ला केला आहे. 
 
webdunia
लष्कराचा गणवेश घालून तीन ते चार दहशतवाद्यांनी आधी बसवर हल्ला केला त्यानंतर जवळच्या पोलिस स्टेशनवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्याचे पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले. सध्या चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांकडून हॅन्ड ग्रेनेडचा वापर करण्यात येत आहे.
 
या घटनेनंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आले असून गुरुदासपूरमधील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi