Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकमधून येतात सर्वाधिक बनावट नोटा

पाकमधून येतात सर्वाधिक बनावट नोटा
देशात सर्वाधिक बनावट नोटा पाकिस्तानातून येत असल्याची माहिती वित्त राज्यमंत्री नमो नारायण मीना यांनी गुरुवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. गुप्तचर संस्था आणि तपास संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च दर्जाच्या सर्वाधिक बनावट नोटा पाकिस्तानातूनच येत असल्याचे मीना यांनी नमूद केले. बनावट नोटांवर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिकेची मदत गेतली जात असून, भारत-अमेरिका यांच्यातील करारानुसार बनावट नोटांबाबत माहितीची आदानप्रदान करणे, परस्परांच्या गुप्तचरांची मदत घेणे हे उपाय केले जात आहेत, असल्याचे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi