Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्याच्या विद्यार्थ्याला 'गूगल'कडून २ कोटींची ऑफर

पुण्याच्या विद्यार्थ्याला 'गूगल'कडून २ कोटींची ऑफर
पुणे , मंगळवार, 24 नोव्हेंबर 2015 (17:45 IST)
पुण्याच्या २२ वर्षीय अभिषेक पंतला 'गुगल'कडून तब्बल दोन कोटी रुपयाचं वार्षिक पॅकेजची ऑफर मिळालीय. 
 
आयआयटी खारगपूरमध्ये सध्या अभिषेक कम्प्युटर सायन्सच्या अखेरच्या वर्षाला शिकतोय. त्यानं नुकतीच कॅलिफोर्नियात 'गुगल'मध्ये आपली तीन महिन्यांची इंटनशिप संपवली होती. 
 
अभिषेकनं दिलेल्या माहितीनुसार, गूगलमध्ये  नोकरीसाठी त्यानं दोन इन्टरव्ह्यू हे फोनवरुन दिले. त्यानंतर गूगलच्या डॉक्युमेंट कोडिंग करण्यासाठी त्याला सांगण्यात आलं. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजरनं त्याची मुलाखत घेतली.... आणि त्यानंतर त्याला गूगलच्या डिझाइन सोल्युशनसाठी निवडण्यात आलं. 
 
अभिषेकचा जन्म आणि वाढ अमेरिकेतच झालीय. २००६ साली आपल्या कुटुंबीयांसोबत अभिषेक अमेरिकेतून भारतात परतला होता. 
 
यानंतर अभिषेकचे आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता आणि भविष्याकरता चिंतीत होते. भारतीय शिक्षण पद्दतीत मुलं कसं स्वत:ला मिसळून घेतील, अशी त्यांच्या मनात शंका होती. परंतु, अभिषेकनं हे करून दाखवलं. डीपीएसचा विद्यार्थि असलेल्या अभिषेकनं दहावीत तब्ब्ल ९७.६ टक्के मार्क मिळवले होते. 
 
सप्टेंबर २०१६ मध्ये तो गुगलमध्ये कामावर रुजू होईल. यासाठी अभिषेक खुपच उत्साहित आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi