Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'पूरग्रस्ताना मदत करा, माझा वाढदिवस साजरा करु नका'

'पूरग्रस्ताना मदत करा, माझा वाढदिवस साजरा करु नका'
नवी दिल्ली , सोमवार, 15 सप्टेंबर 2014 (11:12 IST)
जम्मू काश्मीरमध्ये कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्या्चा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे माझा वाढदिवस आपल्या समर्थकांनी साजरा करू नये, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. येत्या 17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे.

मोदींनी ट्वीकट करून आले मित्र आणि समर्थकांना माझा वाढदिवस साजरा न करण्यायचे आवाहन केले आहे. वाढदिवसासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा पैसा जम्मूकाश्मीरमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचेही आवाहन मोदी यांनी संपूर्ण देशवासीयांना केले आहे.

जम्मू काश्मीरमधील पूराचे पाणी अजूनही ओसरलेले नाही. लाखो लोकांना बेघर व्हावे लागले आहे. त्यांना मदत करणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचेही मोदींनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi