Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रसिद्ध शायर निदा फाजली यांचे निधन

प्रसिद्ध शायर निदा फाजली यांचे निधन
, सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (15:31 IST)
मुंबई- हिंदी- उर्दू भाषेचे प्रसिद्ध शायर निदा फाजली यांचे सोमवारी वर्सोवा स्थित आपल्या घरात हृदयविकारामुळे निधन झाले. ते 78 वयाचे होते आणि मागील काही दिवसांपासून आजारी होते. आज दुपारी 11.30 सुमारे त्यांनी शेवटचा निरोप घेतला. 
 
किती विचित्र बाब आहे की ज्यांच्या शायरीने लाखो लोकांचे हृदय जिंकले, त्यांच्या स्वत:च्या हृदयाचे ठोके चुकले. तरी आपल्या चाहत्यांना हृदयात ते सदैव जीवित राहतील.
 
निदा फाजली हे नाव साहित्य आणि गझलच्या क्षेत्रात प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्याद्वारे रचित शायरींना गायक जगजीत सिंह यांनी आपली आवाज देऊन अमर केले आहेत. आणि योगायोग बघा की आज जगजीत सिंग यांची जन्मतिथी आहे आणि फाजली यांनी आजचं निरोप घेतला.
 
त्यांचे पूर्ण नाव मुक्तदा हसन निदा फाजली असे होतं. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1938 रोजी दिल्ली येथे झाला होता. त्यांचे शिक्षण ग्वालियर येथे झाले. फाजली यांना 1998 साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले गेले.
 
त्यांचा निधनाची बातमी ऐकल्यावर त्यांचा चाहत्यांना खूप दुख झाले आहे. तसेच बॉलीवूडही हळहळले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi