Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रीमिम ट्रेनचे तिकीट स्वस्त होणार

प्रीमिम ट्रेनचे तिकीट स्वस्त होणार
नई दिल्ली , शुक्रवार, 29 मे 2015 (11:40 IST)
भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या प्रीमियम ट्रेनला अव्वाच्या सव्वा तिकीट दरांमुळे प्रतिसाद मिळत नव्हता. हे लक्षात घेऊन रेल्वेने आता प्रीमियम ट्रेनच्या तिकीट दरांचा लगाम खेचत प्रवाशांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. यानुसार आता प्रीमियम ट्रेनच्या दरांमध्ये वेगाने वाढ होणार नाही.
 
प्रीमियम ट्रेनच्या तिकिटांचे दर हे विमानांच्या तिकीटदरांपेक्षाही महाग जात असल्याने प्रवाशांनी या ट्रेनकडे पाठ फिरवली. 
 
अखेर रेल्वेने प्रीमियम ट्रेनच्या तिकीट दर यंत्रणेत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिकिटांचे दर आटोक्यात आणण्यासोबच आता प्रीमियम ट्रेनचे तिकीट केवळ ऑनलाइन नाही तर तिकीट काउंटरवर देखील उपलब्ध होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi