Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फाशीला कसाबचे सुप्रीम कोर्टाच आव्हान

फाशीला कसाबचे सुप्रीम कोर्टाच आव्हान

वेबदुनिया

नवी दिल्ली , शनिवार, 30 जुलै 2011 (14:51 IST)
26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला एकमेव आरोपी अजमल कसाब याने आपल्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने कसाबला दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कसाबने मुंबईतील तुरुंग अधिकार्‍यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, या खटल्यातील अन्य आरोपी फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन यांना निर्दोष मुक्त करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोन्ही याचिकांवर एकाचवेळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्याची शक्यता आहे.



Share this Story:

Follow Webdunia marathi