Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'फेसबुक'वरील कमेंट प्राध्यापकाला भोवली

'फेसबुक'वरील कमेंट प्राध्यापकाला भोवली
नवी दिल्ली , गुरूवार, 24 जुलै 2014 (09:05 IST)
सोशल वेबसाइट 'फेसबुक'वर कमेंट करणे एका प्राध्यापकाला चांगलीच भोवली आहे. संबंधित प्राध्यापकाला निलंबीत करण्यात आले आहे. सैय्यद ‍रिझवी असे या प्राध्यापकाचे नाव आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू ‘बिंडोक’असल्याची कमेंट सैय्यद रिझवी यांनी केली होती. या आक्षेपार्ह कमेंटमुळे विद्यापीठाने रिझवी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे आपल्याला आपले मत व्यक्त करण्याीचा पूर्ण अधिकार असल्याचे सैय्यद रिझवी यांनी म्हटले आहे. मात्र, रिझवी यांचे कमेंट आक्षेपार्ह असून विद्यापीठ प्रशासनाने त्यांना निलंबीत केले आहे. विशेष म्हणजे रिझवी यांना अलिगडच्या बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi