Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंगळुरूत पहिल्या महिला कॅब चालकाची आत्महत्या

बंगळुरूत पहिल्या महिला कॅब चालकाची आत्महत्या
, बुधवार, 29 जून 2016 (09:53 IST)
बंगळुरू- बंगळुरूमधील पहिली महिला कॅब चालक भारती विराथ (39) हिने स्वत:च्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ती ‘उबेर’ कंपनीसाठी कॅबचालक म्हणून काम करत होती.
 
भारती ही उत्तर बंगळुरूतील बळ्ळारी रोडवरील एका इमारतीत तिसर्‍या मजल्यावर राहत होती. रविवारी संध्याकाळपासून ती कुठेही न दिसल्याने चौकशीसाठी तिचे शेजारी आज घरी गेले. तेव्हा ती पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांना तिच्या मृतदेहाशेजारी किंवा घरात कसल्याही प्रकारची ‘सुसाइड नोट’ आढळली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. 
 
या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून अधिक चौकशी सुरू केली आहे. मूळची तेलंगणाच्या वरंगल जिल्ह्यातील असलेली भारती बंगळुरूतील पहिली कॅबचालक होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

1 जुलैपासून दूध 2 रुपांनी महागणार