Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंगळुरूमध्ये शिक्षकाने ६ वर्षीय विद्यार्थीनीवर केला बलात्कार

बंगळुरूमध्ये शिक्षकाने ६ वर्षीय विद्यार्थीनीवर केला बलात्कार
बंगळुरू , शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 (13:18 IST)
पूर्व बंगळुरूमधील एका खासगी शाळेतील शिक्षकाने शाळेतच सहा वर्षीय मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या दहा दिवसांतील ही दुसरी घटना असून याप्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षीय शिक्षकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. 
 
शाळेत मुलांच्या स्वच्छतागृहात त्याने या बालिकेवर अत्याचार केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पहिलीत शिकणा-या मुलीने मंगळवारी घरी आल्यावर गुप्तांगात वेदना होत असल्याची तक्रार आईकडे केली. मात्र इन्फेक्शनमुळे असे होत असल्याचे तिच्या आईला वाटले. पण बुधवारी त्या बालिकेने परत वेदना होत असल्याचे सांगितल्यावर तिची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर वैद्यकीय तपासात तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र डॉक्टरांनी लिखीत स्वरूपात काहीही देण्यास नकार दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi