Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिहारमध्ये आढळला इबोलाचा संशयित रुग्ण?

बिहारमध्ये आढळला इबोलाचा संशयित रुग्ण?
पाटणा , मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (11:22 IST)
बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात 'इबोला'चा संशयित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आफ्रिकेतील लाइबेरियातून संपूर्ण जगभरात पसरलेला इबोला व्हायरस आता भारतात पोहोचला आह. गोपालगंज जिल्ह्यातील लोमी चोर गावातील रहिवासी वीरेंद्र सिंह यांना 'इबोला व्हायरस'ची लागण झाल्याची शक्यता वैद्यकीय पथकाने वर्तवली जात आहे. वीरेंद्र सिंह यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असता त्यात इबोलाची लक्षणे आढळल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सिंह यांना तातडीने रुग्णालयात बोलावून घेण्यात आले आहे. 
 
गोपालगंज जिल्ह्यात इबोला व्हायरसचा रुग्ण आढळल्यान संपूर्ण राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. वीरेंद्र सिंग 27 ऑगस्ट रोजी भारतात परतले होते. ते लाइबेरिया येथे नोकरीसाठी गेले होते. लाइबेरियामध्ये 'इबोला'ची साथ पसल्याने जवळपास 625 भारतीय नागरीक मायदेशी परतले. लाइबेरियातून भारतात परतलेल्या प्रत्येक व्यक्तीची विमानतळावरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वैद्यकीय पथक तपासणी करत आहे. त्यात सिंह यांना इबोलाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi