Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिहारमध्ये केजरीवाल यांना दाखविण्यात आले काळे झेंडे

बिहारमध्ये केजरीवाल यांना दाखविण्यात आले काळे झेंडे
, गुरूवार, 27 ऑगस्ट 2015 (10:38 IST)
पाटणा- पाटणा दौर्‍यावर गेलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सकाळी विमानतळावर काळे झेंडे दाखविण्यात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत केजरीवाल एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 
 
पाटणा विमानतळावर दाखल होताच केजरीवाल यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समर्थकांना काळे झेंडे दाखविले. तसेच अण्णांना धोका दिल्याच्या घोषणाही दिल्या. विमानतळावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
केजरीवाल आणि नितीश कुमार एका चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत. केजरीवाल या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. केजरीवाल यांनी नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांना पूर्वीच पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi