Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीएमडब्ल्यू पोसणार कोण : शोभा डे

बीएमडब्ल्यू पोसणार कोण : शोभा डे
मुंबई- रिओ ऑलिम्पिकमधील यशस्वी खेळाडूंना बीएमडब्ल्यू भेट मिळाल्या, पण या महागड्या गाड्या पोसणार कोण? असं शोभा डे यांनी ट्वीट केल आहे.
 
रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. सचिन तेंडुलकरच्या हस्ते चौघांना बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून देण्यात आल्या.
 
डे यांनी सचिन तेंडुलकरविषयी सवाल विचारला आहे. सचिनने ज्या ऑलिम्पिकवीरांना बीएमडब्ल्यू ‘भेट दिली’ त्यासाठी त्याच्या खिशातून पैसे गेले का?’ असा प्रश्न डे यांनी विचारला आहे.
 
भारतीय पथकाचं एकच लक्ष आहे, रिओला जा, सेल्फी काढा आणि रिकाम्या हाती परत या. पैसा आणि संधी वाया घालवा’ अशा आशयाचा ट्वीट शोभा डे यांनी केला होता. त्यानंतर देशभरातल्या ट्विटराईट्सकडून शोभा डे यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. अमिताभ बच्चन, अभिनव बिंद्रा, वीरेंद्र सेहवाग अशा विविध क्षेत्रातल्या सेलिब्रेटींनीही डे यांना सुनावलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आठ राजकीय पक्षांना नोटीसा