Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बुलडोझर माझ्या अंगावर चालवा; राहुल गांधी आक्रमक

बुलडोझर माझ्या अंगावर चालवा; राहुल गांधी आक्रमक
नवी दिल्ली , शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (15:29 IST)
दक्षिण दिल्लीतील रंगपुरीतील झोपड्यांवर बुलडोझर चालवण्या आधी माझ्या अंगावर चालवा, असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  राहुल गांधी झोपडपट्टी वासीयांसाठीच्या मदतीला धावून आले. एरव्ही सुरक्षारक्षकांच्या संरक्षणात दिसणारे राहुल गांधी चक्क रस्त्यावर उतरलेले पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. 
 
दिल्लीच्या रंगपुरी परिसरात अनेक अवैध झोपड्या आहेत. त्यांच्यावर वन विभागाने कारवाई सुरु केली आहे. त्याला आता राहुल गांधी यांनी विरोध दर्शवला आहे. झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्याआधी माझ्या अंगावर बुलडोझर चालवा, असा इशारा राहुल यांनी शासकीय अधिकार्‍यांना दिला आहे. 
 
राहुल म्हणाले, ऐन थंडीत झोपडपट्टीतील लोकांना बेघर करणे चुकीचे आहे. कारवाई करताना प्रशासनाने त्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi