Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बु-हानला अगोदर अटक का केली नाही : पीडीपी

बु-हानला अगोदर अटक का केली नाही : पीडीपी
दिल्ली , गुरूवार, 21 जुलै 2016 (13:31 IST)
जम्मू काश्मीरमधील भाजपाचा मित्रपक्ष पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) बु-हान वनीच्या हत्येवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत हत्या करण्याची काय गरज होती ? असा उलट सवाल विचारला आहे. बु-हान वनी गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता, तर मग त्याला अगोदर अटक का करण्यात आली नाही ? असा सवाल पीडीपीचे खासदार मुझफ्फर बेग यांनी उपस्थित केला.

सरकारने लष्करी अधिकाराऐवजी नैतिक अधिकाराचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वनी मारला गेल्यानंतर केंद्र सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने केला आहे. आंदोलन शमवण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत असल्याचा दावा करत केंद्र सरकारने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नदीपात्रात दोन मुलींचे मृतदेह सापडल्याने खळबळ