Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेंगलूरूनंतर अहमदाबादमध्येही बॉम्बस्फोट

तीस जणांचा मृत्यू, शंभराहून अधिक जखमी

बेंगलूरूनंतर अहमदाबादमध्येही बॉम्बस्फोट

वेबदुनिया

अहमदाबाद , शनिवार, 26 जुलै 2008 (23:54 IST)
बंगलूरूमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्येही दहशतवाद्यांनी सलग सोळा स्फोट बॉम्बस्फोट घडवून आणले आहे. हल्ल्यात तीव्यक्तींचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक जखमी झाले आहेत.

मणिनगर, ईशानपूर, नारोळ सर्कल, बापूनगर, हटकेश्वर, सारंगपूर ब्रिज, सारकेज व आढाव या भागात कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले आहेत.

बेंगलूरूमध्ये काल (शुक्रवारी) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये साखळी स्फोट घडवून दहशतवाद्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बेंगलूरू स्फोटात दोघांना बळी गेला होता.

जखमींपैकी काही गंभीर जखमी असून जखमींना जिल्ह्या रूग्णालय व एल जी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी आठ स्फोटास दुजोरा दिला आहे.

मात्र वृत्तवाहिनीनुसार आतापर्यंत सोळा स्फोट झाले आहेत. साकरेज भागात सीएनजी बसमध्ये स्फोट झाला. जयपूर बॉम्बस्फोटात (13 मे) सायकलवर स्फोटके लादून 65 घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाप्रमाणेच येथेही काही ठिकाणी सायकलवर स्फोटके लादून स्फोट घडवून आणले आहे. काही ठिकाणी टिफीनमध्यें स्फोटके ठेवण्यात आली होती.

सर्व स्फोट वर्दळीच्या ठिकाणी करण्यात आले. बॉम्बस्फोटानंतर दूरध्नवी लाइन्स जाम करण्यात आल्या आहेत. यानंतर संपूर्ण शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

बॉम्बस्फोटानंतर ई-मेल: शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याअगोदर इंडिया टीव्हीच्या कार्यालयात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा धमकीचा ई-मेल पाठवला होता.

मणिनगर हे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. मोदींना याअगोदरही दहशतवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या.

पंतप्रधानांकडून बॉम्बस्फोटांचा निषेध: पंतप्रधान मनमोहन सिंग व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बॉम्बस्फोटांचा निषेध केला असून नागरिकांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. यादरम्यान दिल्ली, जयपूर, हैदराबाद सारख्या महत्त्वपूर्ण शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi