Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपचे महाराष्ट्रात शतक तर हरयाणात स्पष्ट बहुमत

भाजपचे महाराष्ट्रात शतक तर हरयाणात स्पष्ट बहुमत
मुंबई/ चंदीगढ , सोमवार, 20 ऑक्टोबर 2014 (11:39 IST)
भाजपने महाराष्ट्र विधानसभेत शतक झळकावून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या तर हरयाणात 90 पैकी 46 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. काँग्रेसमुक्त भारताची हाळी देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निकालामुळे मोठे बळ मिळाले आहे.
 
लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यामुळे राजकीदृष्टय़ा कोमात गेलेल काँग्रेसला हा जबरदस्त धक्का मानला जात आहे. महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय रविवारी स्वत:हूनच जाहीर केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, भाजपला आपण बिनशर्त पाठींबा देणार नाही. भाजपला सत्ता स्थापन करायची असल्याने त्यांनी पहिल्यांदा प्रस्ताव पाठविला पाहिजे.
 
मोदी लाटेमुळे दोन्ही राज्यात काँग्रेसला जबरदस्त पराभव पत्करावा लागला. हरयाणात काँग्रेसने 46 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. हराणात गेली 10 वर्षे सत्तेवर असणार्‍या काँग्रेसचा तर महाराष्ट्रात 15 वर्षे सत्ता असणार्‍या काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचा पराभव झाला. मराष्ट्रात भाजपने चार मित्रपक्षांसह 122 जागा मिळविल्या. 288 सदसंच विधानसभेत भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 23 आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.
 
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास विरोध नसल्याचे सांगत जुना मित्र शिवसेनेकडे चक्क दुर्लक्ष केले आहे. शिवसेनेने 61 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादीने भाजपला विनाशर्त पाठींबा देऊ केल्याने आता शिवसेनेवरच दबाव वाढला आहे.
 
लोकसभा निवडणुकीनंतर मोदी यांच्या लोकप्रियतेची पहिली मोठी परीक्षा म्हणून पाहिल्या गेलेल्या या निवडणुकीत भाजपने लोकसभेचा विजय हा योगायोग नव्हता, हेच सिध्द केले. मोदी यांनी महाराष्ट्रात 27 तर हरयाणात 11 जाहीर सभा घेतल्या. मोदी यांच्या सर्वच सभांना लाखापेक्षा अधिक लोक उपस्थित होते.
 
भाजपच संसदीय मंडळाची नवी दिल्लीत बैठक पार पडली. मोदी, शहा, राजनाथसिंह, सुषमा स्वराज आणि शिवराजसिंह चौहान या बैठकीस उपस्थित होते. राष्ट्रवादी व काँग्रेसने महाराष्ट्रात अनुक्रमे 37 व 39 जागा मिळविल्या.
 
भाजपने 257 जागा लढविल्या तर मित्रपक्षांना 23 जागा दिल्या होत्या. मनसेचे दिवाळे निघाले असून त्यांचा एकच आमदार विजी झाला. एफआएम ने दोन आमदार निवडून आणत महाराष्ट्रात प्रथमच खाते उघडले.

Share this Story:

Follow Webdunia marathi