भारतीय बनावटीच्या स्पेस शटल आरएलव्ही-टीडीचे आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
एखाद्या "एसयूव्ही‘ मोटारइतका आकार आणि वजन असलेले "आरएलव्ही-टीडी‘ अवकाशयान अंतिम उद्दिष्ट असलेल्या अवकाशयानाचे प्रारूप आहे. पुनर्वापर करता येण्यासारखे पंख हे या अवकाशयानाचे वैशिष्ट्य आहे. साडेसहा मीटर लांब आणि पावणेदोन टन वजनाचे हे पहिले भारतीय बनावटीचे अवकाशयान आहे. आपल्या देशातील वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाचं फळ असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत यशस्वी प्रक्षेपणाबद्ल वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.