Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भूसंपादन विधेयक होणारच : मोदी

भूसंपादन विधेयक होणारच : मोदी
दिल्ली , गुरूवार, 28 मे 2015 (10:13 IST)
काहीही झाले तरी भूसंपादन विधेयक संसदेत पारित करण्यात येईलच, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. शेतकरी, गरीब, गाव आणि राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या तर त्या मंजूर करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जीएसटी विधेयकही पारित करण्यात येणार आहे, असे सांगताना मोदी म्हणाले, भूसंपादन आणि जीएसटी ही दोन्ही विधेयके देशाच्या हिताची आहेत. राजकारण बाजूला सारून सर्वच राजकीय पक्षांनी या विधेयकांची प्रशंसा करायला पाहिजे. राज्यांनी जीएसटी रचनेला सहमती दर्शविलेली आहे. जीएसटी विधेयक लोकसभेत पारितही झालेले आहे. आता ही दोन्ही विधेयके पारित होणे हा वेळेचा भाग आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi