झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार मधू कोडा यांच्या निवासस्थानासह 70 जागांवर आयकर विभागाने छापे टाकत अब्जावधीची बेहीशोबी मालमत्ते संबंधीची कागदपत्रं जमा केली आहेत.
कोडा यांनी दोन हजार कोटीच्या हवाल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचे यात उघड झाले आहे.
झारखंड आणि बिहारचे आयकर संचालक उज्ज्वल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोडा यांच्या सहकाऱ्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले.
दिल्ली, कोलकाता, नाशिक, रांची, लखनो, चाईबासा, आणि जमशेदपूर येथील अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.