Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मध्यप्रदेशात बलात्कारानंतर तरुणीची आत्महत्या

मध्यप्रदेशात बलात्कारानंतर तरुणीची आत्महत्या
बीना , गुरूवार, 3 जुलै 2014 (15:35 IST)
मध्यप्रदेशातील बीना येथील एका तरुणीने 70 फूट उंच टॉवरवरुन उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तरुणीवर बलात्कार झाल्याचे स्पष्‍ट झाले आहे. तिच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी पोलिसांना ही माहिती मिळाली. पोलिसांनी आतापर्यंत एकाही आरोपीला अटक केलेली नाही.
 

मिळालेल्या माहितीनुसार, डिंडोरी जिल्ह्यातील तरछ येथे राहाणारी 19 वर्षीय तरुणी शहडोल येथे शिक्षण घेत होती. 22 जून रोजी जबलपूर पोस्ट ऑफिसच्या परीक्षेसाठी इंदूरला निघाली होती.

29 जून रोजी मी फोन केला तेव्हा तिचा फोन बंद होता. ती बीना येथे कशी गेली हे माहीत नाही, असे  तरुणीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. मात्र, चोर सोडून पोलिसांनी संन्यास्याला दोषी धरले आहे. मृत तरुणीला पोलिसांनी विक्षिप्त आणि वेडी ठरवले आहे. ‍विशेष म्हणजे पोलिस हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. बुधवारी पॉस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला आहे.

मृत तरुणीवर बलात्कार झाला की तिने स्वमर्जीने शारीरिक संबंध ठेवले हेतपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिस अधिक्षकांनी म्हटले आहे. दुसरीकडे, पॉस्टमॉर्टम करणार्‍या पॅनलमधील डॉ. बलबीर कॅथोरिया यांचे म्हणणे आहे, की तरणीवर बलात्कार झाला होता. तरुणीच्या शरीरावर दातांच्या खुणा आणि ओरबडल्याच्या व्रण होते. टॉवरवरुन उडी घेतल्याने तिच्या बरगड्या तुटल्या आणि पाय देखील फ्रॅक्चर झाला होता. 

डॉ.कॅथोरिया यांना सांगितले, 'पोस्टमॉर्टम पॅनलने रिपोर्ट तयार केल्यानंतर  बुधवारी दुपारी 1.30 वाजता मी स्वतः पोलिस स्टेशनला फोन करुन रिपोर्ट घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणीही आले नाही. पोलिस याप्रकरणी फारच धिलाई करत असल्याचे बोलले जात आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi