Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मध्‍यप्रदेश: कॉंग्रेस आमदाराची हत्‍या

मध्‍यप्रदेश: कॉंग्रेस आमदाराची हत्‍या

वेबदुनिया

उत्तर प्रदेशातील एका उमेदवाराच्‍या मृत्यूनंतर आता मध्‍यप्रदेशातही निवडणुकीला हिंसेचे गालबोट लागले असून मध्यप्रदेशातील भिंड जिल्‍ह्यात कॉंग्रेसचे आमदार असलेल्‍या माखनलाल जाटव यांना गोळ्या घालून ठार करण्‍यात आले आहे.

माखनलाल जाटव भिंडच्‍या गोहद विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार होते. ते आपल्‍या लोकसभा मतदार संघाचे उमेदवार भगीरथ प्रसाद यांच्‍या निवडणुकीचा प्रचार करत असताना अज्ञात व्‍यक्तीने गर्दी आणि अंधाराचा फायदा घेऊन त्‍यांच्‍या कानपट्टीजवळ पिस्‍तुल नेऊन गोळी झाडली.

आमदाराच्‍या हत्‍येमुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या हत्‍येमागे भाजपाचा हात असल्‍याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्‍याचे पक्षाने जाहीर केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi