Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'मन की बात'मधून ईको फ्रेन्डली गणेशोत्सवाचं आवाहन

'मन की बात'मधून  ईको फ्रेन्डली गणेशोत्सवाचं आवाहन
दिल्ली , सोमवार, 29 ऑगस्ट 2016 (15:15 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमधून जनतेला ईको फ्रेन्डली गणेशोत्सवाचं आवाहन केलं आहे. मोदींनी मन की बातच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मन की बातच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चार संस्थांचा गौरव केला आहे. यात अकोल्याची निसर्गकट्टा, कोल्हापूरातील निसर्गमित्र आणि विज्ञानप्रबोधिनी या संस्थांसोबत,गिरगावच्या राजाचाही समावेश आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून केलेल्या मोदींनीमन मन की बातमध्ये त्यांच्या कार्याची आठवण करुन दिली.तसंच मुली आज कशातही कमी नाहीत. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला जी पदकं मिळाली ती मुलींनी मिळवून दिली आहेत. शिवाय ललिता बाबरने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे आणि दीपा कर्माकरची कामगिरीही भारावून टाकणारी होती असं मोदी म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जैन मुनींवर वादग्रस्त ट्विट केल्याने केस दर्ज