Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी चित्रपटांचा ‘सुवर्ण गौरव’

मराठी चित्रपटांचा ‘सुवर्ण गौरव’
दिल्ली : , सोमवार, 4 मे 2015 (11:25 IST)
मराठी चित्रपटांचा ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘सुवर्ण गौरव’ करण्यात आला. ‘कोर्ट’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘ख्वाडा’, ‘किल्ला’ आदी चित्रपटांचा गौरव झाला.
 
विज्ञात भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण झाले. सर्वोत्कृष्ट ‘कोर्ट’ला सुवर्णकमळ व अडीच लाख रुपये, ‘एलिझाबेथ एकादशी’स सर्वोत्कृष्ट बालचित्रपट, ‘किल्ला’ला विशेष उल्लेखनीय चित्रपट, रवी जाधव दिग्दर्शित ‘मित्रा’स सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘ख्वाडा’ या चित्रपटाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड देऊन गौरविले.

Share this Story:

Follow Webdunia marathi