Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटकवॉरंट

मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटकवॉरंट
दिल्ली :  धनादेश न वटल्या प्रकरणी न्यायालयाने उद्योगपती विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटकवॉरंट काढले आहे. मल्ल्या यांना हजर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
 
वारंवार समन्स बजावूनही मल्ल्या न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना हजर करण्यासाठी सरकारी यंत्रणेने हस्तक्षेप करणे गरजेचे झाले असल्याचे न्यायालयाने म्हटले. डायल कंपनीने धनादेश न वटल्या प्रकरणी मल्ल्यांना कोर्टात खेचले आहे.  मल्ल्यांची कंपनी किंगफिशर एअरलाईन्सने डायलला एक कोटी रूपयांचा धनादेश दिला होता. मात्र, तो वटला नाही.
 
महानगर दंडाधिकारी सुमीत आनंद यांनी मल्ल्या यांना ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. परराष्ट्र मंत्रालयाद्वारे अजामिनपात्र अटक वारंट बजावले जावे, असे या आदेशात म्हटले आहे. विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये असल्याचे सांगितले जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मित्रांसोबत सेल्फी काढताना विद्यार्थ्याचा मृत्यू