Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माजी मुख्यमंत्री अंतुले अत्यवस्थ

माजी मुख्यमंत्री अंतुले अत्यवस्थ
मुंबई , मंगळवार, 25 नोव्हेंबर 2014 (11:31 IST)
राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. अब्दुल रेहमान अंतुले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. किडनी निकामी झाल्याने गेल्या महिनाभरापासून ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अंतुले यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांना मागील महिन्यात किडनी विकारावरील उपचारासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अद्याप त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीत केंद्रीय मंत्रिपद भूषवलेले अंतुले उपचाराला प्रतिसाद देत नसून त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 
 
सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अहमद पटेल, मोहन प्रकाश यांनीदेखील त्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. यासह राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी रुग्णालयाला भेट दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi