Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझ्या मुलावरील बलात्काराचे आरोप खोटे- सदानंद गौडा

माझ्या मुलावरील बलात्काराचे आरोप खोटे- सदानंद गौडा
कोची , गुरूवार, 28 ऑगस्ट 2014 (16:40 IST)
आपल्या मुलावर बलात्काराच्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. त्याच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे आल्याचे रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी म्हटले आहे.या प्रकरणी आपण कोणतेही हस्तक्षेप करणार नाही. पोलिस त्यांचे काम करत असल्याचे गौडा यांनी स्पष्ट केले. 
 
दरम्यान, सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक यांच्याविरोधात कन्नडमधील एका मॉडेलने बलात्कार आणि फसवणूक केल्याचे  आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सदानंद गौडा यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. 
 
कोडागू जिल्ह्यातील कुशालनगर येथे कार्तिक यांचा बुधवारी साखरपुडा झाला. त्यानंतर त्यांच्याविरोधात एका मॉडेलने बलात्काराची आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. कार्तिक यांच्याशी आपला विवाह झाल्याचा दावाही संबंधित मॉडेलने केला. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi