Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माफीसाठी अर्ज नाही - संजय दत्त

माफीसाठी अर्ज नाही - संजय दत्त

वेबदुनिया

WD
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर संजयने आज प्रथमच पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपण कायद्यासमोर शरणागती पत्करणार असल्याचं संजयनं म्हटलंय. यावेळीच त्यानं आपली चूकही कबूल केलीय. ‘माझ्याकडून चूक झाली. पण भारताविरुद्ध कट रचण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो... माफीसाठी प्रयत्न करणार नाही... मी शरणागती पत्करणार’ असं संजयनं म्हटलंय. यावेळी संजय दत्तसोबत प्रिया दत्तही उपस्थित होती.

संजय म्हणाला, ''मी लवकरच न्यायालयासमोर शरण जाणार आहे. मला देशाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदर आहे. न्यायालयाच्या आदेशाचे मी उल्लंघन करणार नाही. मला या शिक्षेपासून माफी मिळावी, यासाठी मी अर्ज केलेला नाही आणि करणारही नाही. मी काही निर्मात्यांना वचन दिले आहे, ते पूर्ण करणार आहे. माझ्याजवळ खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि भरपूर काम करायचे आहे. आजपासून मी चित्रीकरणाला सुरवात करणार आहे.''

Share this Story:

Follow Webdunia marathi