अगुस्ता वेस्टलँड कंपनीकडून खरेदी केलेल्या हॅलिकॉप्टर मुद्यावरुन माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नसून आपण कुणालाही घाबरत नसल्याचंही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.
अगुस्ता वेस्टलँडच्या खरेदीमध्ये भारतीय उच्चपदस्थांनी लाच खाल्याचे इटालीतल्या कोर्टात सिद्ध झाले आणि लाच देणाऱ्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली. मंगळवारी मिलानमधल्या कोर्टाचा हा निकाल आल्यानंतर त्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे संसदेत उमटले व्हीव्हीआयपींसाठी अगुस्ता वेस्टलँड कंपनीकडून खरेदी केलेल्या हॅलिकॉप्टर मुद्यावरुन खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव उच्चारताच आक्रमक झालेले काँग्रेस खासदार राज्यसभा अध्यक्षांसमोरील वेलमध्ये आले आणि जोरदार त्यांनी घोषणाबाजी सुरु केली.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना सोनिया गांधींनी या सरकारला दोन वर्षे झाली असून त्यांनी या दोन वर्षांमध्ये काहीच चौकशी का केली नाही असा प्रतिप्रश्न केला आहे. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नसून आपण कुणालाही घाबरत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.