Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुस्लिमांनो एकत्र या; हाफिज सईद आवाहन

मुस्लिमांनो एकत्र या; हाफिज सईद आवाहन
नवी दिल्‍ली , गुरूवार, 24 जुलै 2014 (20:24 IST)
दिल्लीतील महाराष्‍ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांनी एका मुस्लिम कर्मचार्‍यांच्या तोंडात जबरदस्तीने चपाती कोंबल्याचे पडसाद अमेरिकेत उमटले आहे. मुंबईच्या 26/11 या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदने  मुस्लिमांना एकत्र येणाची हाक दिली आहे.

महाराष्ट्र सदनात घडलेल्या घटनेला सईदने मुस्लिम तत्त्वांवरील हल्ला असल्याचे संबोधले आहे. भारतीय मुस्लिम जनतेला या दडपशाहीविरोधात एकत्र येण्याचे आवाहनही केले आहे. दुसरीकडे, ज्या 11 खासदारांनी या मुस्लिम व्यक्तीश  असभ्य वर्तवणूक केली आहे. सईदने ForcedToBreakFast या नावाने पाच ट्वीट केले आहे. भारत सरकारवर सईदने कडाडून टीकाही केली आहे. शिवसेना खासदारांचे हे कृत्य मानवतावादाविरोधात आहे. शिवसेनेने थेट मुस्लिम मुल्ल्यांवर हल्लाच केला आहे. मोदींच्या राज्यात अशा प्रकारच्या घटना घडतात ही आश्चर्याची बाब असल्याचे सईदने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi