Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुस्लिमांसाठी भाजप, संघ सक्रिय

मुस्लिमांसाठी भाजप, संघ सक्रिय
, सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (17:09 IST)
जम्मू - मुस्लिम समुदायाच्या उन्नतीसाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रयत्नशील असल्याचे मत आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले आहे. संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंच या माध्यमामधून रोजगार, योग्य शिक्षण, आवास आणि विविध माध्यमांमधून काम केले जात आहे. 
 
कुमार यांनी सांगितले की मुस्लिमांचा उत्कर्षासाठी एमआरएम स्थापित करण्यात आले आहे. या संस्थेचा उद्देश्य मुस्लिम मुलांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे आहे. याचबरोबर इतर जनहित योजनांच्या माध्यमामधून काम केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
मुस्लिम समुदायाच्या वाईट परिस्थितीला विविध राजकीय पक्षांचे अनुनयाचे राजकारण कारणीभूत असल्याची टीकाही कुमार यांनी केली. त्यांनी म्हटले की जम्मू काश्मीर मुस्लिम बहुसंख्याक राज्य असून येथील भारत त्यांच्यासाठी सर्वोत्तम देश असल्याचे अनेक लोकांचे मत आहे आणि येथे इतर समुदायांप्रमाणेच मुस्लिमांचीही भरभराट होईल, असे या समुदायामधील बहुसंख्याची भावना आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi