Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मृत्युचे तांडव: मायलेकांचा मृतदेह आढळला, तीन दिवसांचे बाळ जिवंत

मृत्युचे तांडव: मायलेकांचा मृतदेह आढळला, तीन दिवसांचे बाळ जिवंत
श्रीनगर , सोमवार, 15 सप्टेंबर 2014 (15:23 IST)
जम्मू-काश्मीरमध्ये पुराचे पाणी ओसरत आहे. परंतु काही भागात पुराचे पाणी अजून कमी झालेले नाही. नवव्या दिवस उलटल्यानंतर तीन दिवसांचे बाळ जिवंत आढळून आले आहे. तसेच दुसरीकडे मृतावस्थेत मायलेक आढळून आले आहे. महिलेच्या पाठीला एक च‍िमुरडा बांधलेल्या अवस्थेत बचाव पथकाला आढळून आले. 
 
बचाव कार्य करणार्‍या लष्कराच्या जवानांनी आतापर्यत पाच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.जवानांना  अवघ्या तीन दिवसांचे बालक सापडले आहे. या बालकासह त्याच्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे मेजर  आशिष शर्मा यांनी सांगितले. 
 
जम्मू-काश्मीरात पुरात आतापर्यंत 200 पेक्षा जास्त जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अद्याप दीड लाख लोक पुरात अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी हवाईदल, एडीआरएफचे जवान प्रयत्न करत आहे. अद्याप बचाव पथक अनेक भागात पोहोचलेले नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 
 
नैसर्गिक संकटाने जम्मू काश्मीरमधील अनेक गावे वाहून गेली आहेत. अधूनमधून होणार्‍या पावसामुळे बचाव कार्यात  अनेक अडचणी येत आहे. पुराचा धोका कमी झाला असला तरी, पुरामुळे महामारी पसरण्याची शक्यता वर्तवली जात  आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi