Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींकडून माझ्या स्वप्नांच्या ठिकर्‍या : जेठमलानी

मोदींकडून माझ्या स्वप्नांच्या ठिकर्‍या : जेठमलानी
नवी दिल्ली , मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (10:58 IST)
‘वन रँक वन पेन्शन’च्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या लष्करातील माजी सैनिकांना भारतीय जनता पक्षाचे माजी सदस्य व ख्यातनाम विधिज्ञ राम जेठमलानी यांनी पा¨ठबा दर्शविला. या माजी सैनिकांची भेट घेत जेठमलानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर तीव्र हल्ला चढविला. मोदी यांच्याकडून माझ्या स्वप्नाच्या ठिकर्‍या उडाल्याचे जेठमलानी यांनी यावेळी सांगितले.
 
लोकसभेसाठीच्या प्रचारादरम्यान मी संपूर्ण देशभर फिरून मोदी ही देवाकडून मिळालेली भेट असल्याचे सांगितले होते. मात्र मोदी यांच्याकडून माझ्या या स्वप्नाचा चक्काचूर झाल्याचे सांगताना मला लज्जित झाल्यासारखे वाटत आहे. दिलेली वचने ते पूर्ण करणार नसल्याचे चिन्हे दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्टपणे दिसू लागली आहेत. त्यांच्याप्रती मला असलेले आदर व प्रेम नाहीसे झाल्याचे मी त्यांना आधीच सांगितले आहे, असा कठोर हल्ला जेठमलानी यांनी यावेळी चढविला. 
 
अर्थमंत्री हा देवाचा आपल्याला मिळालेला सर्वात भयंकर शाप आहे. ते तुमचे शत्रू आहेत; ते सर्व देशाचेच शत्रू आहेत, असे जेठमलानी म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi