Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींच्या कोटवर राहुल गांधींची टीका

मोदींच्या कोटवर राहुल गांधींची टीका
नवी दिल्ली , शुक्रवार, 30 जानेवारी 2015 (10:58 IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा लाखांचा कोट घातला होता, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजित प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते. विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन पाळण्यात मोदी यांना अपयश आल्याचे सांगून राहुल म्हणाले, सरकारने अणुकरारातील कोंडी फोडण्यासाठी अमेरिकेपुढे गुडघे टेकले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi