Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींच्या नावाने आंबा

मोदींच्या नावाने आंबा
, सोमवार, 30 मार्च 2015 (15:39 IST)
आता फळांचा राजा अशी ओळख असलेल्या आंब्याच्या वेगवेगळ्या जाती तयार करण्यात हातखंडा असलेल्या प्रख्यात हाजी कलिमुल्ला यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाने आंब्याचा एक प्रकार तयार केला आहे.
 
मोदी यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या या प्रकाराच्या झाडाच्या पहिल्या काही फळांची चव स्वत: मोदी यांना चाखता यावी यासाठी मी बाजूला काढून ठेवली आहेत. परंतु, ते आंबे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची  माझ्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. नरेंद्र मोदी यांनी फळांच्या राजाची चव चाखावी अशी आपली मनापासून इच्छा आहे, असे आंब्याच्या वेगवेगळ्या जाती विकसित केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या कलिमुल्ला यांनी सांगितले.
 
आपण स्वत: नरेंद्र मोदी यांना हा फळाचा राजा भेट द्यावा, अशी मनोमन इच्छा आहे आणि त्यांना याची चव निश्चितच आवडेल याची खात्री आहे, असेही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi