Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदी आणि राहुलची तुलना नको!

मोदी आणि राहुलची तुलना नको!

वेबदुनिया

WD
गुजरातमध्ये भाजपच्या लक्षवेधी विजयानंतर भाजप नेत्यांनी वक्तव्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांनी, राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना करणे योग्य नाही! 2014मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करताना कायदा मंत्री अश्विनी कुमार म्हणाले, की राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करणे योग्य नाही. काँग्रेस देशातील धर्मनिरपेक्ष राजकारणाचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. भविष्यात राहुल गांधी नेतृत्व करणारे मुख्य नेते असतील.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ घेऊन ते म्हणाले, की काँग्रेसच्या मतांमध्ये दोन्ही राज्यांमध्ये वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रसने मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi