Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदी का पडले सोशल मीडियाच्या प्रेमात

मोदी का पडले सोशल मीडियाच्या प्रेमात
, शनिवार, 19 एप्रिल 2014 (17:05 IST)
सोशल मीडियातून तुम्हाला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, तुमच्या सोशल मीडियाच्या टीमच्या कामाविषयी तुम्ही काय सांगाल, असा सवाल एएनआयन नरेंद्र मोदी यांना केला. यावर नरेंद्र मोदी हे सोशल मीडियाच्या टीमविषयी काहीही बोलले नाहीत. मात्र त्यांनी सोशल मीडियाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट केला. नरेंद्र मोदी यावर बोलताना म्हणाले, लहान मुलांनाहीसोशल मीडियाकडून खूप टीप्स मिळतात. मूल परीक्षेआधी सोशल मीडियाकडून टीप्स घेत आहे.

सोशल मीडिया देशात जागृकता निर्माण करण्याचं काम करतंय. पुढे मोदी म्हणाले, मला टॅलेण्ट शो खूप आवडायचे, जेव्हा माझ्याकडे वेळ असे तेव्हा मी पाहायचो. मला खूप आवडायचं ते मुलांचं टॅलेण्ट, मी सोशल मीडिया जेव्हा पाहिलं तेव्हा आणखी समजलं आपल्या देशात किती हुशार मुलं आहेत. सोशल मीडियाचा वापर शिकण्यासाठी, सोशल मीडियाला मी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन होत आहे. सोशल मीडियाला राजकीय साच्यात बांधू नका, सोशल मीडिया खूप मोठी ताकद आहे. शेतकर्‍यांना कोणत्या बाजारात, कुठे चांगला भाव मिळेल यासाठी सोशल मीडियाचा वापर होतोय.  सोशल मीडिया हामोदी का पडले सोशल मीडियाच्या प्रेमात?सर्वासाठी महत्त्वाचा आहे. सोशल मीडियाला फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनातून नाही, तर विकासाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi