Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदी सरकार सैरभैर झाले आहे : केजरीवाल

मोदी सरकार सैरभैर झाले आहे : केजरीवाल
दिल्ली , गुरूवार, 28 जुलै 2016 (11:11 IST)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी व्हिडीओ अस्त्र उगारून, पंतप्रधान मोदींवर मुस्कटदाबीचा आरोप केला आहे. मोदी सरकार सध्या सैरभैर झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे सरकार मला संपवू देखील शकते, असा आरोप त्यांनी केला आहे.

केजरीवालांनी आज एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, यामध्ये आमदारांचे अटक सत्र, आणि संसदीय सचिवांच्या मुद्द्यवरून आमित शाह आणि मोदींना दोषी ठरवले आहे. ट्विटरवरूनही आपला राग व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये मोदीजी तुमच्या आजाराचे नाव केजरीवाल असून, हा व्हायर सर्व देशात पसरत असल्याचे म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नौदलाचं 'ड्रोन' समुद्रात कोसळलं