Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदी-सोनिया ‘चाय पे चर्चा’, पण..

मोदी-सोनिया ‘चाय पे चर्चा’, पण..
नवी दिल्ली , शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (09:26 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज ‘चाय पे चर्चा’ केली. मात्र या बैठकीत वस्तू आणि सेवा कर विधेयकावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे ‘पुन्हा चर्चा करू’ असे म्हणत या नेत्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. बैठकीला संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू आणि अर्थमंत्री अरुण जेटली हेही उपस्थित होते.
 
बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माहिती दिली. ‘जीएसटी विधेयकाबाबत काँग्रेसने तीन सूचना दिल्या आहेत. त्याचवेळी सरकारनेही आपले म्हणणे त्यांच्यापुढे ठेवले आहे. 
 
त्यानंतर एकमत होऊ शकलेले नाही. मात्र या मुद्दय़ावर पुन्हा बैठक होणार आहे’, असे जेटली यांनी सांगितले. या बैठकीत संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याच्यादृष्टीनेही सकारात्मक चर्चा झाल्याचे जेटली यांनी नमूद केले.
 
विरोधकांचे आरोप फेटाळले
 
मोदी म्हणाले.. 
 
सरकारचा एकच धर्म आहे तो म्हणजे ‘इंडिया फर्स्ट’.. सरकारचा एकच धर्मग्रंथ आहे तो म्हणजे भारताची राज्यघटना.. राज्यघटनेचे बळच देशाला सशAत बनवेल यावर आमचा विश्वास आहे
 
* ‘सत्यमेव जयते’,‘अहिंसा परमो धर्म’,‘जनसेवा म्हणजेच प्रभूसेवा’हीच ‘आयडिया ऑफ इंडिया’आहे. 
 
* एका बाजूला बहुमत आहे.. जास्त लोक आहेत.. म्हणून काहीही थोपवले जाता नये. सगळ्यांच्या सहमतीने निवडला गेलेला मार्गच सर्वात योग्य असतो
 
* घटना सोडाच पण त्यातील एखादे चित्र बदलायचे म्हटले तरी त्यावर आक्षेप घेतले जातील एवढी ही संवेदनशील बाब आहे
 
* आज एखादा कायदाही आपण बनवला तरी संसदेच्या पुढच्या अधिवेशनात त्यातील चुकांची दुरुस्ती करावी लागते. यावरून अवघ्या तीन वर्षात राज्यघटनेची निर्मिती करताना घटनाकारांनी काय तपस्या केली असेल याची कल्पना करा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi