Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यूएईच्या 'त्या' विमानात शस्त्र आणि दारुगोळा

यूएईच्या 'त्या' विमानात शस्त्र आणि दारुगोळा

वेबदुनिया

कोलकात्यातील नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंधन भरण्यासाठी संयुक्त अरब अमीरात (यूएई)च्या हवा‌ईदलाचे विमान रविवारी उतरले होते. या विमानात भारतीय कस्टम अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा आढळून आल्याने खळबळ उडाली असून, वैमानिकासह इतर नऊ सदस्यांची चौकशी करण्यात येत आहे.

विमान प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार युएईच्या हवाई दलाचे C130J हे विमान इंधन भरण्यासाठी कोलकाता विमानतळावर उतरले होते. विमानात कोणते सामान आहे या विषयी चालक दल अथवा यूएईच्या हवाई दलाने कोणतीही माहिती भारतीय विमान अधिकाऱ्यांना दिली नाही.

भारतीय कस्टम अधिकाऱ्यांनी वैमानिक आणि चालक दलातील सदस्यांची चौकशी केली असता, यात मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी याची माहिती विमान प्राधिकरण आणि सुरक्षा यंत्रणांना दिली.

विमान हा शस्त्रास्त्रांचा साठा घेऊन चीनच्या हेनयांग शहराकडे जात असल्याची माहिती उघड झाल्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाने याची दखल घेत या विमानाची चौकशी सुरू केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते विंग कमांडर महेश उपासनी यांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi